५ लाख लाडक्या बहिणी झाल्या सावत्र, योजनेतून शासनाने वगळले
५ लाख लाडक्या बहिणी झाल्या सावत्र, योजनेतून शासनाने वगळले

जळगाव टाइम्स मुंबई वृत्तसेवा | महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी लाभदायक ठरलेली “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना आता मोठ्या चर्चेत आली आहे. राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक्स वर पोस्ट करत योजनेतील बदललेल्या निकषांची माहिती दिली आहे. या नव्या निकषांनुसार पाच लाख महिला योजनेतून अपात्र ठरल्या आहेत.
आदिती तटकरे यांनी सांगितले की, २८ जून २०२४ आणि ३ जुलै २०२४ रोजी निर्गमित शासन निर्णयानुसार ही सुधारणा करण्यात आली आहे. या निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांची यादी जाहीर केली असून, योजनेतून खालील महिलांना वगळण्यात आले आहे:
विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी फायदेशीर ठरलेल्या या योजनेतील बदल राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे मानले जात आहेत. विरोधकांनी यावर टीकास्त्र सोडण्याची शक्यता असून, सत्ताधारी पक्षाने निकषांच्या पारदर्शकतेचा मुद्दा मांडला आहे. महिला व बाल विकास विभागाने योजनेतील बदलांविषयी सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी करण्याचे संकेत दिले आहेत. या निर्णयामुळे अनेक महिलांच्या आर्थिक साहाय्यावर परिणाम होणार आहे, त्यामुळे येत्या काळात राजकीय व सामाजिक पातळीवर यासंदर्भात चर्चेला वेग येण्याची शक्यता आहे.
अपात्र ठरविण्यात आलेल्या निकषांप्रमाणे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या २,३०,००० महिलांना वगळण्यात आले आहे. तसेच वय वर्षे ६५ पेक्षा जास्त असलेल्या १,१०,००० महिलांना योजनेतून अपात्र ठरविले गेले आहे. कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या आणि स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या १,६०,००० महिला आहेत. यानुसार एकूण पाच लाख महिला आता अपात्र ठरल्या आहेत