क्राईम

दुचाकीच्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू; तिसरा गंभीर जखमी

दुचाकीच्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू; तिसरा गंभीर जखमी

जळगाव टाइम्स प्रतिनिधी। नशिराबाद रोडवरील पाटील नर्सरी समोर भरधाव दुचाकी डिव्हायडरवर धडकल्याने दोन तरूणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना २२ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता घडली होती. तर एकजण गंभीर जखमी झाला होता. याप्रकरणी मंगळवारी २८ जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजता नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय रवींद्र अहिरे वय-२८ आणि सुमित विनोद करोसिया वय-१८ दोन्ही रा. पाचोरा जि.जळगाव असे मध्ये झालेल्या दोधी तरुणांचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पाचोरा शहरातील रहिवासी असलेले अजय अहिरे, सुमित करोसिया आणि राज अजयसिंग परदेशी हे तिघेजण ट्रिपल सीट दुचाकी क्रमांक (एमएच ५४ ए ५७६८) ने भुसावळकडून जळगावकडे निघाले होते. त्यावेळी दुचाकी ही अजय अहिरे हा चालवत होता. राष्ट्रीय महामार्गावरून येत असताना अजय अहिरे याचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने नशिराबाद गावाजवळील पाटील नर्सरी समोर भरधाव दुचाकी धडकली. या अपघातात अजय अहिरे आणि सुमित करोसिया या दोघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर राज परदेशी हा गंभीररित्या जखमी झाला. जखमी झालेल्या राज परदेशी याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या संदर्भात मंगळवारी २८ जानेवारी रोजी राज परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत विरणारे हे करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button