आरोग्यताज्या बातम्या
मुक्ताईनगर तालुक्यात भीषण अपघातात पती-पत्नी ठार
मुक्ताईनगर तालुक्यात भीषण अपघातात पती-पत्नी ठार

मुक्ताईनगर (13 जानेवारी 2025): कांद्याचे रोप आणण्यासाठी गेलेल्या दाम्पत्याच्या दुचाकीला अज्ञात भरधाव वाहनाने जबर धडक दिल्याने दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी सायंकाळी रणथम फाट्याजवळ घडला. निना ज्ञानदेव नारखेडे (65) व सुनीता निना नारखेडे (59, रूईखेड, ता. मुक्ताईनगर) अशी मयत दाम्पत्याची नावे आहेत.
नारखेडे दाम्पत्य पुर्णा काठावरील दूधलगाव येथे साळ भावाकडे कांद्याचे रोप घेण्यासाठी गेले होते. परतीच्या मार्गाने रूईखेड येथे घराकडे जाताना रणथम फाट्यानजीक त्यांच्या दुचकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली, त्यात दोघ पती पत्नीचा मृत्यू झाला