महाराष्ट्र ग्रामीण

“ही दोस्ती तुटायची नाय” शालेय वर्ग मित्र-मैत्रिणींनी नातं जपलं

"ही दोस्ती तुटायची नाय'' शालेय वर्ग मित्र-मैत्रिणींनी नातं जपलं

जळगाव टाइम्स नितीन ठाकूर 

पाळधी:- शालेय जीवन म्हणजे एक वेगळंच जिवन असतं, एक मैत्रीचे नाते म्हणजेच यात कुठलाही भेदभाव नसतो तसंच पाळधी येथील स.नं. झवर विद्यालयातील इयत्ता दहावी २००५-२००६ च्या बॅचचे सर्व ४० ते ५० वर्ग मित्र-मैत्रिणींनी अपघातात मृत्यू पावलेल्या आपल्या वर्ग मित्राच्या परिवाराला आर्थिक मदत म्हणून पैसे गोळा करून चाळीस हजार रूपये त्यांच्या मुलीच्या नावे जमा करून दिले. या मदतीने या गृपच्या मित्र-मत्रिणींनी माणुसकीचा झरा दाखवून समाजात एक आदर्श निर्माणकरून दिला.

फुलपाट येथील रहिवाशी वर्ग मित्र स्व.दत्तू पाटील या मित्राला एक मुलगा व एक मुलगी आहे. यांची आर्थिक परिस्थिती हलाकीची आहे. स्व. दत्तू पाटील यांच्या मित्रांनी आपल्या ग्रुप माध्यमातून एक हात मदतचीचा हा निर्णय घेऊन सर्व शालेय ४० ते ५० मित्र-मैत्रिणींनी आपआपल्या ईच्छेनुसार पैसे गोळा करून ४० हजार रुपये पर्यंतची मदत म्हणून स्व. मित्राच्या मुलीच्या नावाची बँकेत विशिष्ट कालवधीसाठी जमा ठेव पावती तयार करून दिली .

या शालेय वर्ग मित्र मैत्रिणींचा या उपक्रमाने इतर मित्रांनी सुध्दा अशी एकनिष्ठ मैत्रीचे नातं कायम जपत आणि आपले मित्र परिवारात सुख-दुखात असं खंबीरपणे उभे राहून स्वर्गीय मित्राच्या परिवाराला आर्थिक मदत केली.

सतत सोबत असावे हे कार्य खुपच उल्लेखनीय आहे यालाच मित्र परिवार असं म्हणतात या सर्व मित्रांनी आपली मैत्रीची जाणीव करून दिली. हे खरे मित्र आज एकत्र येऊन हा उपक्रम राबविण्यात आला. या सर्व मित्र मैत्रिणींचे हे कार्य कौतुकास्पद आहे. यामुळेच आज धडाकेबाज या चित्रपटातील ओवी ओठावर आली. “ही दोस्ती तुटायची नाय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button