ताज्या बातम्या

सहयोग मल्टीस्टेट को ऑप बँके कडून फराळ:गरिबांची दिवाळी गोड करणे यात समाधान- अनिल जोशी‎

गरिबांची दिवाळी

जळगाव टाइम्स प्रतिनिधी| सहयोग मल्टीस्टेट को ऑप बँक यांच्या कडून उजाड कुसुंबा या ठिकाणी गरजु बालकांना कपडे , मिठाई आणि फराळ वाटप करण्यात आली याप्रसंगी प्रसगी शाखा व्यवस्थापक श्री अनिल जोशी, गटविकास अधिकारी योगेश देवरे , श्री गजानन पाटील सर , किरण पाटील, किरण सुरवाडे आणि गावातील उपसरपंच कैलास सोनवणे यांची  उपस्थिती होती. या कार्याबद्‌दल गावकऱ्यांनी बँकेचे खूप कौतुक केले.

या प्रसंगी बोलताना अनिल जोशी म्हणाले; दिन दुःखींचे दिवाळी गोड करण्यात मोठे समाधान मिळते. सणाचा राजा समजाला जाणारा प्रकाशाचा उत्सव अर्थात दिवाळी सण सध्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. घरो घरी आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे. स्वतः साठी, आपल्या कुंटूंबासाठी कोणीही करतात परंतु दिन दुःखींना, गरंजूमंदाना मदत करणे हे महान कार्य आहे. पूजा-पाठात, मंदीरात, दान करण्यात जे पुण्य मिळते त्यापेक्षा कमी पुण्य यात मिळणार नाही, मानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button