क्राईम

रीलस्टार विक्की पाटील खून प्रकरणी काकासह,चुलत भाऊ आणि जे.सी.बी चालकास अटक

रीलस्टार विक्की पाटील खून प्रकरण

जळगाव टाइम्स प्रतिनिधी| एरंडोल :- माजी सैनिकाने मुलाचा खून करून आत्महत्या केल्या प्रकरणात पोलिसांनी मयताचा काका,चुलत भावासह जे.सी.बी. चालकास अटक केली.तीनही संशयितांना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायाधीश एकनाथ चौगले यांनी दिला.पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांनी चोवीस तासाच्या आत संशयितांना अटक करून खड्ड्यासाठी वापरण्यात आलेले जेसीबी जप्त केल्याबद्दल नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी,की येथील वृंदावननगर मधील रहिवासी माजी सैनिक विठ्ठल सखाराम पाटील यांनी त्यांचा मुलगा हितेश विठ्ठल पाटील हा दारू पिऊन वारंवार त्रास देवून मारहाण करीत असल्याच्या कारणावरून त्याचा गळफास देवून खून केला होता.मुलाचा खून केल्यानंतर विठ्ठल सखाराम पाटील यांनी देखील स्वत:च्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली होती.आत्महत्या करण्यापूर्वी विठ्ठल पाटील यांनी मी मुलाचा खून केला असून त्याचा मृतदेह भवरखेडा (ता.धरणगाव) येथील गोविंदबाबा धरणाच्या कोरड्या पात्रामध्ये बुजवला असल्याची चिठ्ठी लिहून ठेवली होती.पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी,अप्पर अधीक्षक कविता नेरकर,अमळनेर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांनी घटनास्थळी भेट देवून परिसराची पाहणी करून तपासाबाबत मार्गदर्शन केले होते.पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड व त्यांच्या सहका-यांनी मयताच्या चिठ्ठीवरून तपास करून घटनास्थळावरून पुरलेले प्रेत काढले होते.

पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांचेसह सहाय्यक निरीक्षक शंकर पवार,सहाय्यक निरीक्षक रोहिदास गबाले.हवालदार अनिल पाटील,कपिल पाटील,संदीप पाटील,योगेश पाटील,मिलिंद कुमावत,आकाश शिंपी,प्रशांत पाटील यांनी तपासाची चक्रे फिरवून हितेशचे काका नामदेव सखाराम पाटील,चुलत भाऊ भालचंद्र नामदेव पाटील यांचेसह जेसीबी चालक रवींद्र सुरेश पाटील या तीन संशयितांना अटक केली.

व्हिडिओ वृत्तांत:- 

तिघाही संशयितांना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायाधीशांनी दिला.हितेशच्या खून प्रकरणात वडिलांसह अन्य दोन ते तीन संशयितांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना होता.त्यादिशेने पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांनी तपासाची चक्रे फिरवून सर्वांना ताब्यात घेतले.संशयितांनी विठ्ठल पाटील यांनी हितेशचा खून केल्यानंतर त्याचा मृतदेह जेसीबीच्या सहाय्याने खड्डा खोडून त्याचा मृतदेह पुरून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये मयताचे काका नामदेव सखाराम पाटील हे त्यांचे बंधू विठ्ठल पाटील यांच्या आत्महत्येच्या गुन्ह्यात फिर्यादी होते.मुलाचा खून केल्यानंतर विठ्ठल पाटील यांनी त्यांचे बंधू नामदेव पाटील यांना घटनेची माहिती दिली होती,मात्र दोन दिवस झाल्यानंतर देखील त्यांनी पोलिसांना माहिती दिली नाही.याबाबत मयताची पत्नी शितल हितेश पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून तिघाही संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button