मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगाव विमानतळावर दाखल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगाव विमानतळावर दाखल

जळगाव टाइम्स प्रतिनिधी। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज जळगाव जिल्हा दौरा असून सायंकाळी ५ वाजता त्यांचे जळगाव विमानतळावर आगमन झाले आहे. जामनेर येथील देवाभाऊ कुस्तीस्पर्धा व शेंदुर्णी येथील एका कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहे.
यावेळी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, खासदार स्मिताताई वाघ, आमदार राजूमामा भोळे, आमदार चंद्रकांत सोनवणे, माजी आमदार अनिल चौधरी, आमदार अमोल पाटील, आमदार अमोल जावळे यांच्यासह जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांची उपस्थिती होती.
दरम्यान जामनेर येथील देवाभाऊ कुस्तीस्पर्धा व शेंदुर्णी येथील र्यक्रम आयोजन करण्यात आले आहे. या या दोन्ही कार्यक्रमांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हजेरी लावणार आहे. या संदर्भात आयोजकांकडून जय्यत तयारी करण्यात आलेली आहे.
हे पण बघा