ताज्या बातम्या

हॉटेल मुरली मनोहरमध्ये भीषण आग; मोठे नुकसान !

हॉटेल मुरली मनोहरमध्ये भीषण आग; मोठे नुकसान !

जळगाव टाइम्स प्रतिनिधी। जळगाव शहरातील आकाशवाणी चौकातील हॉटेल मुरली मनोहरच्या किचनमध्ये गुरुवारी, ६ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे २ वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीमुळे हॉटेल मुरली मनोहर आणि जवळील वेलनेस मेडिकल दुकानाचेही नुकसान झाले आहे. आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

घटना घडल्यावर परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेतली आणि आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. नागरिकांची मदत मिळाल्यानंतर जळगाव महानगरपालिकेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचत आग विझवण्याचे काम सुरू केले. त्याचबरोबर नागरिकांनी परिसरातील दुचाकी आणि इतर वाहने सुरक्षित ठिकाणी हलवली, ज्यामुळे आणखी कोणतेही नुकसान होण्यापासून टळले.

घटनेची माहिती मिळताच पोलिस विभाग आणि अग्निशमन दल तात्काळ कारवाईसाठी दाखल झाले. मात्र, पोलीस ठाण्यात अद्याप या प्रकरणी कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही, तसेच आगीचे नेमके कारण काय होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. स्थानिक नागरिकांच्या मदतीमुळे मोठा अनर्थ टळला.

हे सुध्दा बघा 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button