क्राईम

पाचोरा शहर हादरले ! किरकोळ कारणावरून 20 वर्षीय तरुणाचा खून

पाचोरा शहर हादरले ! किरकोळ कारणावरून 20 वर्षीय तरुणाचा खून

जळगाव टाइम्स प्रतिनिधी|पाचोरा: पाचोरा शहरात किरकोळ कारणावरून वीस वर्षीय युवकाची चाकूने वार करून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आलीय. हेमंत संजय सोनवणे (वय – २० रा. महात्मा फुले नगर, पाचोरा) असं मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी संशयित आरोपी रोहित गजानन लोणारी याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरुद्ध पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या घटनेबाबत असे की, मंगळवारी रात्री छत्रपती शिवाजी महाराज चौकातुन शिवजयंती निमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. रात्री बारानंतर मिरवणूक संपल्यानंतर हेमंत संजय सोनवणे आला शहरातील बाहेरपुरा येथे रोहित लोणारी याने किरकोळ कारणावरून धारदार चाकूने पोटात वार करुन घटना स्थळावरुन पसार झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या हेमंत सोनवणे यास तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हेमंत सोनवणे हा गंभीर जखमी असल्याने त्यास जळगाव येथे उपचारार्थ हलविण्यात आले. दरम्यान हेमंत सोनवणे याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

याप्रकरणी हल्ला करणाऱ्या रोहीत लोणारी यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून याप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये त्याच्याविरुध्द खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक पवार हे करीत आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

हे पण बघा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button