क्राईमताज्या बातम्या

जिल्ह्यात अपघातांचे सत्र सुरूच, मनपा कर्मचारीचा जागीच मृत्यू

जिल्ह्यात अपघातांचे सत्र सुरूच, मनपा कर्मचारीचा जागीच मृत्यू

जळगाव टाइम्स प्रतिनिधी जळगाव : जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना दि. ९ रोजी रविवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास धरणगाव तालुक्यातील वराड येथील बस स्थानकाजवळ महामार्गावर भरधाव ट्रकने मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

या संदर्भात सविस्तर वृत्त असेकी, वराड बु गावा जवळील महामार्गावरील बस स्थानकानजीक जळगावकडून एरंडोलकडे जाणारा ट्रक क्रमांक एम.एच.०४ सी. आर ९९९९ ने मोटरसायकल क्रमांक एम.एच. १९ डी. ३७२६ ला जोरदार धडक दिली. या अपघातात मोटरसायकलस्वार विनोद वसंत कोळी (वय ४८) रा. जवखेडे (हिगोणे) ता. एरंडोल यांचा जागीच मृत्यू झाला आहे. मयत विनोद कोळी हे जळगाव महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी असून ते रविवारी ड्यूटीकरून काही खासगी कामांसाठी गेले तेथून ते गावी घरी परत जात असतांना त्यांना ट्रकने जोरदार धडक दिल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याचे समजते.

महामार्गावर अपघात झाल्याचे समजताच वराड येथील महिला पुरुषांनी घटनास्थळी घाव घेतली. यावेळी वराड ग्रामस्थांनी रुग्णवाहिका बोलावून मयताचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालय येथे रवाना केला होता. यासाठी बापू महाजन, सचिन महाजन, विनोद पाटील, प्रशांत पाटील, गावातील पोलीस •ाटील व वराड ग्रामस्थांनी मदत कार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button