महाराष्ट्र ग्रामीण

वृद्ध दांपत्याच्या घराच्या अतिक्रमणाच्या प्रकरणी पोलीस ठाण्यात गोंधळ

वृद्ध दांपत्याच्या घराच्या अतिक्रमणाच्या प्रकरणी पोलीस ठाण्यात गोंधळ

जळगाव टाइम्स प्रतिनिधी। जळगाव शहरातील सबजेलच्या पाठीमागील भागातल्या गणेश नगरातील वृद्ध दांपत्याच्या घराच्या अतिक्रमणाच्या प्रकरणी महापालिकेने जमीनदोस्त केल्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी १ फेब्रुवारी रोजी रात्री पोलिसांच्या कारवाईमुळे मोठा गोंधळ उडाला आहे. या घटनेत सामाजिक कार्यकर्ते वृद्ध दांपत्याला घर बांधून देण्याचा प्रयत्न करत असल्याचे समोर आल्याने हा गोंधळ उडाला असे बोलले जात आहे.

जळगाव शहरातील सबजेलच्या पाठीमागील गणेश नगरात विश्वनाथ जगन्नाथ सुतार वय ७६ हे आपल्या पत्नीसह गेल्या काही वर्षांपासून मोकळ्या जागेत झोपडी करून वास्तव्याला आहेत. त्यांनी ही झोपडी एका खासगी प्लॉटच्या जागेत झोपडी बांधून वास्तव्याला आहेत. या संदर्भात प्लॉटधारकाने महानगरपालिकेत तक्रार दिली. त्यानुसार प्लॉटवरील अतिक्रमण केलेली झोपडी काढण्यात आली. ही गोष्ट जळगावातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी वृद्ध दांपत्याला पाठिंबा दर्शविला आहे. त्यांनी वृद्ध दांपत्याला घर बांधून देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यावरून प्लॉटधारक तक्रारदार याने पोलिसांना सोबत घेऊन घटनास्थळी हजेरी लावली. त्यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली. सामाजिक कार्यकर्ते आणि वृद्ध दांपत्य यांनी पोलिसांच्या कारवाईवर आक्षेप घेतला. या संदर्भात वृद्ध आजोबांनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यांनी आरोप केला की, तक्रारदाराने त्यांना शिवीगाळ केली आणि धमकावले.

वृद्ध आजोबा विश्वनाथ सुतार यांनी म्हटले की, “मी चार वेळा तक्रार दिली, पण पोलिस एकदाही चौकशी करायला आले नाहीत. तक्रारदाराने तक्रार दिल्यानंतर दहा मिनिटांत पोलिस त्याला सोबत घेऊन आले.” त्यांनी आणखी म्हटले, “मी गरीब आहे, म्हणून माझ्या तक्रारीची दखल घेतली जात नाही. श्रीमंतांच्या तक्रारी तत्काळ दाखल केल्या जातात.” असा आरोप केला आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी वृद्ध दांपत्याला पाठिंबा दर्शविला आहे. त्यांनी वृद्ध दांपत्याला घर बांधून देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या संदर्भात पोलिस ठाण्यात सामाजिक कार्यकर्ते आणि पोलिस अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली, ज्यामुळे मोठा गोंधळ उडाला. पोलिसांनी या प्रकरणाची तपासणी सुरू केली आहे. त्यांनी वृद्ध दांपत्याच्या तक्रारीची नोंद घेण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button