आर्थिक घडामोडीउद्योग विश्व

विवेकानंद पतसंस्थेचे कार्य कौतुकास्पद – मंत्री गुलाबराव पाटील

विवेकानंद पतसंस्थेचे कार्य कौतुकास्पद - मंत्री गुलाबराव पाटील

जळगाव टाइम्स नितीन ठाकूर

धरणगाव : सहकार क्षेत्रातील स्पर्धेच्या युगात विवेकानंद पतसंस्थेने विविध सामाजिक विकासातून उभे केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी एका कार्यक्रमप्रसंगी केले

१२ जानेवारी रोजी सकाळी स्वामी विवेकानंद पतसंस्थेच्या सभागृहात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. याप्रसंगी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रमेश पाटील आदी उपस्थित होते.

संस्थेचे चेअरमन अॅड. वसंतराव भोलाणे यांनी प्रास्ताविक केले. संस्थेने राबविलेल्या विविध विकासकाम ांची माहिती त्यांनी सांगितली. तालुक्यातील बेरोजगातीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनाच्या माध्यमातून मोठा उद्योग प्रकल्प उभा करावा, असे संजय पवार यांनी सांगितले. पतसंस्था चालवणे मोठे जिकिरीचे काम आहे. कर्ज देणे व वसुली होणे हेच गरजेचे आहे, त्यातूनच संस्था उभी राहून प्रगतीपथावर जाऊ शकते, असे रमेश पाटील म्हणाले.ज्येष्ठ पत्रकार व माजी चेअरमन कडू महाजन यांनी आपल्या मनोगतातून संस्थेचे सर्व संचालक, कर्मचारी व सभासदांच्या समन्वयातून संस्थेची आर्थिक प्रगती होत असल्याचे नमूद केले. व्हाईस चेअरमन सुधाकर वाणी यांचेही समयोचित भाषण झाले. संस्थेकडून एरंडोल येथील कर्जदाराला स्कॉर्पिओ फोरव्हिलरची चावी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते देण्यात आली.

प्रमुख अतिथींचा संस्थेच्या वतीने शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सूत्रसंचलन मॅनेजर वासुदेव महाजन यांनी केले. संचालक विनायक बागुल, डॉ प्रशांत भावे, संजय चौधरी, प्रकाश जाधव, रतिलाल चौधरी, संचालिका उषाताई वाघ, सुरेखा चौधरी, प्रतिभा चौधरी, सरला चौधरी, विलास महाजन, अभिजित पाटील, पवन महाजन, सुनील चौधरी आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button