क्राईम

वडोदा येथील ग्रामविकास अधिकारी सातव निलंबित

वडोदा येथील ग्रामविकास अधिकारी सातव निलंबित

जळगाव टाइम्स| प्रतिनिधी| मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा ग्राम पंचायतीचे ग्रामविकास अधिकारी विजय सातव यांनी जुलै 2023 ते मार्च 2024 या कालावधीमध्ये ग्रामपंचायतीस मिळालेल्या पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीमध्ये अपहार केल्याप्रकरणी 17 जानेवारी 2025 रोजी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी निशा जाधव यांनी सातव यांना निलंबित केल्याची माहिती दिली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की 12 जुलै 2023 ते 31 मार्च 2024 या कालावधीमध्ये मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा ग्रामपंचायत ला 15 व्या वित्त आयोगाचा निधी मिळाला होता. यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमता व अपहार केल्याप्रकरणी ग्रामविकास अधिकारी विजय विष्णू सातव यांना 17 जानेवारी रोजी गटविकास अधिकारी निशा जाधव यांनी निलंबित केलेले आहे. सातव यांचे कडील कार्यभार कुऱ्हा येथील ग्रामविकास अधिकारी शंकर इंगळे यांच्याकडे देण्यात आलेला आहे. याप्रकरणी वडोदा ग्रामपंचायतीचे उपसरपंच रंजना कोथळकर व प्रदीप हरिदास कोथळकर यांनी वारंवार गटविकास अधिकारी मुक्ताईनगर यांच्याकडे तक्रार केलेली होती. उपसरपंच व प्रदीप कोथळकर यांच्या तक्रारीचे अनुषंगाने व चौकशी समितीच्या अहवालाच्या आधारे गटविकास अधिकारी जाधव यांनी त्यांचे निलंबन केलेले आहे. गावामध्ये रस्ता काँक्रिटीकरण, गटार ढापे, एलईडी लाईट, गावतळे खोलीकरण या कामांचे पैसे काढलेले असून प्रत्यक्षात कामे झालेली नसल्याची तक्रार होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button