उद्योग विश्वमाहिती तंत्रज्ञान

पत्रकारितेतील अडचणींवर मात करण्यासाठी “माय एआय रिपोर्टर” चा वापर करा: मंत्री गुलाबराव पाटील

पत्रकारितेत ए आय रीपोर्टर प्रणाली कार्यान्वित

जळगाव टाइम्स नितीन ठाकूर

जळगाव : मराठी पत्रकारितेत आर्टिफिशिअल इंटेलिजन्सवर आधारित माय एआय रिपोर्टर स्टार्टअपचे उ‌द्घाटन पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांच्या – हस्ते करण्यात आले. माय एआय रिपोर्टरमध्ये स्थानिक, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीपासून विविध प्रकारच्या बातम्यांचे लेखन व पुनर्लेखन करणे सहज शक्य होणार आहे. यात टिटरवरील ट्रेंडिंग विषयांवरून बातम्या, एफ आय आर मधून बातमी किंवा एखाद्या निवेदनावरून देखील बातमी तयार करता येणार आहे. मराठी भाषेत हा देशातील पहिलाच प्रयोग आहे. राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे (मुंबई) जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते या स्टार्टअपचे उद्‌घाटन करण्यात आले

या वेळी आमदार सुरेश भोळे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, जैन उद्योगसमूहाचे मीडियाप्रमुख अनिल जोशी, संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे आदी उपस्थित होते.

न्यूज पोर्टल चालविणे होणार सोपे

डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात काम करताना आपल्याला भेडसावणारी मोठी अडवण म्हणजे स्किल मॅन पॉदर अर्थात कुशल मनुष्यबळ लिखाणाचे उत्तम ज्ञान असणाऱ्या व्यत्रिस त्याच्या अनुभवाप्रमाणे चांगला पगार अथवा मानधन देऊनही आपणास योग्य व्यक्ती मिळत नाही. यामुळे ‘आहे त्या’ मनुष्यबळावर काम करताना डिजिटल पोर्टलवर राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवरील बातम्या अपलोड करताना त्यात कॉपी-पेस्टचे प्रमाण अधिक असते.यामुळे गुगल रैंकिंग न मिळणे, रेव्हेन्यू कमी होणे किंवा कॉपीराइटये इश्यू येणे, या समस्या येतात. या समस्यांवर तोडगा काढत कंटेंट ओशन इनलेटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने माय एआय रिपोर्टर ही आर्टिफिशिअल इंटेलिजन्सवर आधारित संगणकीय प्रणाली लाँच केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button