
जळगाव टाइम्स नितीन ठाकूर
पाळधी, ता. धरणगाव पाळधी येथे झालेल्या जाळपोळ प्रकरणातील आठ संशयितांना आज न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर त्यांना जळगाव येथील कारागृहात रवाना करण्यात आले.
या संदर्भात सविस्तर वृत्त असे की पाळधी येथे ३१ डिसेंबर रोजी झालेल्या वादाच्या पर्यवसनानंतर जाळपोळ करण्यात आली होती. याबाबत २५ ते ३० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील ८ संशयितांना अटक करण्यात आली होती. त्यांची पोलीस कोठडी आज संपत आल्याने त्यांना धरणगाव न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर त्यांची जळगाव येथील कारागृहात रवानगी करण्यात आली. तर फरार संशयितांच्या शोधार्थ पोलिसांची दोन पथके तयार करण्यात आली असून त्या संशयितांना लवकरच ताब्यात घेण्यात येईल, अशी माहिती पो.नि. पवन देसले यांनी दिली.