क्राईमताज्या बातम्या

मोठी बातमी : जळगावात पुन्हा भीषण अपघातः भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीस्वाराला उडविले

मोठी बातमी : जळगावात पुन्हा भीषण अपघातः भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीस्वाराला उडविले

जळगाव टाइम्स| प्रतिनिधी। जळगाव शहरातील ममुराबाद रस्त्यावरील मितवा हॉटेलजवळ सिमेंटने भरलेल्या भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार तरूण हा जागीच ठार झाल्याची घटना गुरूवार १६ जानेवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास् घडली आहे. जळगाव शहरातील ही घटना दुसरी असल्याने खळबळ उडाली आहे. विलास रामसिंग भिल वय ४० रा. ममुराबाद ता.जि. जळगाव असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.

नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील ममुराबाद गावात विलास भील हा तरूण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला होता. ऊस तोडण्याचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. गुरूवारी १६ जानेवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास विलास हा दुचाकी (एमएच १० एआय ०३८१) ने जळगाव शहरातून ममुराबाद येथे घरी येत असतांना ममुराबाद रस्त्यावरील हॉटेल मितवा जवळून जात असतांना रोडवर समोरून सिमेंटने भरलेले ट्रॅक्टकर क्रमांक (एमएच १९ पीआय ३३७५) ने जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार विलास भिल हा जागीच ठार झाला. ही घटना घडल्यानंतर जळगाव तालुका पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मृतदेहाचा पंचानामा करून जिल्हा शासकीय वैद्द्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. याबाबत ट्रॅक्टरवरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button