जळगावमधील पत्रकारांसाठी नवी गृह निर्माण सोसायटी काढण्यासाठी सहकार्य करणार:- मंत्री गुलाबराव पाटील
जळगावमधील पत्रकारांसाठी नवी गृह निर्माण सोसायटी
जळगाव टाईम्स नितीन ठाकूर
जळगांव :- पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, त्यामुळे त्यांच्या लिखाणातून आम्हालाही योग्य तो बोध मिळतो म्हणजे अप्रत्यक्षपणे पत्रकार हे आमचे मार्गदर्शक असल्याचे सांगून जळगावमधील पत्रकारांसाठी नवी गृह निर्माण सोसायटी काढण्यासाठी सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. या वेळी ‘दैनिक तरुण भारत’चे निवासी संपादक चंद्रशेखर जोशी यांना ‘दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईतर्फे दर्पणकार पुरस्कार, व हेल्मेट वितरण कार्यक्रम पत्रकार दिनानिमित्त ६ जानेवारी रोजी जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आला होता.याप्रसंगी मंत्री पाटील बोलत होते. या वेळी आमदार सुरेश भोळे, नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, पुणे येथील ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, जैन इरिगेशनचे जनसंपर्क अधिकारी अनिल जोशी उपस्थित होते
पत्रकार संघाकडून पत्रकारांना हेल्मेट देणे ही अत्यंत स्तुत्य गोष्ट असल्याचे सांगून पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, त्यामुळे त्यांच्या लिखाणातून आम्हालाही योग्य तो बोध मिळतो म्हणजे अप्रत्यक्षपणे पत्रकार हे आमचे मार्गदर्शक असल्याचे सांगून जळगाव मधील पत्रकारांसाठी नवी गृह निर्माण सोसायटी काढण्यासाठी सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई यांच्या दर्पणदिना निमित्त आयोजित दर्पणकार पुरस्कार व हेल्मेट वितरण कार्यक्रमात बोलत होते.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई व दर्पणकार पुरस्कार व हेल्मेट वितरण कार्यक्रम जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार सुरेश भोळे, नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी, पुणे येथील ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, जैन इरिगेशनचे जनसंपर्क अधिकारी अनिल जोशी, जिल्हा दूध संघाचे सदस्य अरविंद देशमुख, ज्येष्ठ पत्रकार सचिन जोशी, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे पदाधिकारी प्रवीण सपकाळे, सचिन गोसावी, प्रवीण पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते .
यावेळी नामदार श्री. गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद, आमदार श्री. सुरेश भोळे, डीआयजी श्री. दत्तात्रय कराळे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी, संपादक श्री. संजय आवटे यांच्या हस्ते प्रिंट मिडियाचे पत्रकार श्री. चंद्रशेखर जोशी, श्री. सुनील पाटील, श्री. सुधाकर जाधव श्री. चेतन साखरे, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार श्री.किशोर, श्री. संजय महाजन श्री.विजय वाघमारे, डिजिटल मीडियाचे श्री. नरेंद्र पाटील, श्री. निलेश पाटील, छायाचित्रकार सचिन पाटील यांना दर्पण पुरस्कार प्रदान करण्यात आला.माध्यमात जशी बातमीसाठी स्पर्धा असते तशी स्पर्धा आमच्या क्षेत्रातही झाली आहे अशी मिश्किल टिप्पणी करून पत्रकारांचे जे प्रश्न असतील ते सोडविण्याचा आमचा प्रयत्न असून पत्रकारांसाठी जळगाव मध्ये नवी गृहनिर्माण सोसायटी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी अधोरेखित केले. पत्रकार दिनानिमित्त सर्व माध्यम प्रतिनिंधीना यावेळी शुभेच्छा दिल्या.