दुर्दम्य प्रतिष्ठानची रुग्णवाहिका रुग्णांसाठी धावली १ लाख कि.मी.
दुर्दम्य प्रतिष्ठानची रुग्णवाहिका रुग्णांसाठी धावली १ लाख कि.मी.

जळगाव टाइम्स प्रवीण परदेशी
धरणगाव : ‘सेवा परमो धर्म,सेवा धर्म सुखावः’ या ब्रीदवाक्याप्रम ाणे सेवा कार्य करीत असलेली दुर्दम्य प्रतिष्ठानची रुग्णवाहिका दोन वर्षात एक लाख किलोमीटर धावली. निःस्वार्थ सेवाभाव ठेवणे हाच यशस्वी जीवनाचा मूलमंत्र आहे. निःस्वार्थतेने केलेल्या सेवेने समाजाला एक नवी दिशा देण्याचे कार्य होत असते.
गेल्या तीन-चार वर्षांपासून दुर्दम्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध सेवाकार्ये केली जात आहेत. प्रतिष्ठानची एक ओमनी रुग्णवाहिका आहे. प्रत्येकाचा जीवनप्रवास जन्मापासून मृत्यूकडे असतो, तर रुग्णवाहिकेतील रुग्णाचा प्रवास मृत्यूकडून जगण्याकडे असतो. दुर्दम्य प्रतिष्ठानची रुग्णवाहिका सेवा रुग्णांना तत्काळ वैद्यकीय सेवा प्रदान करते, प्रथमोपचार प्रदान करून आणि रुग्णाची स्थिती स्थिर करून रुग्णालयात त्वरित पोहोचवते. वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत वेळ फार महत्त्वाची असते. अशावेळी असलेल्या दुर्दम्य प्रतिष्ठानची अद्ययावत ऑक्सिजन सिलिंडर युक्त रुग्णवाहिका रुग्णांना तत्काळ वैद्यकीय सेवा प्रदान करते.
वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत वेळ फार महत्त्वाची असते. दोन्ही रुग्णवाहिकांच्या माध्यमातून अनेक रुग्णांना सेवा देण्याचे काम चालक नानाभाऊ बागुल, प्रकाश मराठे, लोकेश भाटिया व गणेश गुरव करीत असतात. धरणगाव परिसरात अपघात झाल्यास तसेच तत्काळ रुग्णांना जळगाव, नाशिक, पुणे, मुंबई येथे न्यावयाचे असल्यास अतिशय अल्प दरात प्रतिष्ठानची रुग्णवाहिका तत्काळ उपलब्ध होते. आपल्या दुर्दम्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून होत असलेल्या रुग्णांच्या सेवेबद्दल अध्यक्ष कैलास माळी, सचिव मंदार चौधरी, उपाध्यक्ष संतोष सोनवणे व संचालक मंडळाने समाधान व्यक्त केले.