भाजपच्या प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी रवींद्र चव्हाण
भाजपच्या प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी रवींद्र चव्हाण

जळगाव टाइम्स प्रतिनिधी | भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी माजी मंत्री आमव चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या वतीने याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली.
भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय संपादन केल्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर ब यांना महसूल मंत्रीपद हे महत्वाचे खाते मिळाले आहे. तर मंत्रीमंडळातून माजी सार्वजनीक बांधकाम मंत्री रवींद्र यांना वगळण्यात आले होते. तेव्हाच त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी येणार असल्याचे संकेत होते. म त्यांच्याकडे प्रदेशच्या संघटनाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. यानंतर आता त्यांना प्रदेश कार्यकारी अ मिळाले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ही नियुक्ती केली असून भाजपचे राष्ट्रीय महासचिव अ यांनी नियुक्तीचे पत्रक जारी केले आहे.
आज शिर्डी येथे भाजपचे राज्य अधिवेशन होत असून याच्या पूर्वसंध्येला रवींद्र चव्हाण यांच्याकडे कार्यकारी प्रदेशाध्यक्षपद सोपविण्यात आले आहे. तर चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवड प्रदेशाध्यक्षपद राहणार असल्याचे यातून अधोरेखीत झाले आहे. तर, आशीष शेलार यांच्याकडे देखील मुंबईचे कायम ठेवण्यात आलेले आहे.