अखिल भारतीय माळी महासंघाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी पाळधी येथील अनिल माळी यांची निवड.!
अखिल भारतीय माळी महासंघाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी पाळधी येथील अनिल माळी यांची निवड.!

जळगाव टाइम्स नितीन ठाकूर
पाळधी:- हो ही बातमी जरी जुनी असली तरी तिला खोडकर मित्रांनी पुन्हा प्रसिद्ध केली विधानसभेच्या निवडणुका होण्याआधी म्हणजे काही दिवस अगोदरच पाळधी येथील रहिवासी अनिल माळी यांची अखिल भारतीय माळी महासंघाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली होती.
सदरची निवड ही अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय युवक अध्यक्ष नितीनजी शेलार यांच्या आदेशाने उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष युवक आघाडी भूषण महाजन यांनी केली व निवडीचे पत्र हे जिल्ह्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते देण्यात होते.
पण त्यानंतर त्यांच्या मित्रांना हवा तसा जल्लोष व आनंद व्यक्त करता आला नव्हता. आज श्री अनिल माळी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या खोडकर मित्रांनी ही बातमी पुन्हा प्रसिद्ध केली व व्हायरल सुद्धा केली
काय म्हणाले मित्र?
अनिलला आम्ही लहानपणापासून ओळखतो चांगले मित्र मिळविण्यासाठी तुम्ही स्वतः चांगले मित्र असले पाहिजे आणि बहुतेक लोकांसाठी ते महत्त्वाचे आहे. आमचे मित्र आम्हाला आधार, आनंद आणि आपुलकीची भावना देतात. ते कठीण काळात आमच्या पाठीशी उभे राहतात आणि आनंदाच्या क्षणांमध्ये आमच्यासोबत साजरे करतात. हे गंभीर नातेसंबंध विश्वास, विचार आणि मुक्त संवादाच्या महत्त्वावर भर देतात – आणि बंध आयुष्यभर टिकू शकतात, अशा आमच्या मित्राला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा