महाराष्ट्र ग्रामीण

राज्यात लालपरीचा प्रवास महागला : आजपासूनच भाडेवाढीला मंजुरी

राज्यात लालपरीचा प्रवास महागला : आजपासूनच भाडेवाढीला मंजुरी

जळगाव टाइम्स वृत्तसेवा I राज्य परिवहन महामंडळाने (एस.टी.) प्रवाशांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. एस.टी. महामंडळाने बसच्या भाड्याला 15 टक्क्यांची वाढ मंजूर केली आहे. हा भाडेवाढीचा निर्णय शुक्रवार, 24 जानेवारीपासून लागू होणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारला एस.टी. महामंडळाने 15 टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव सादर केला होता, आणि त्यानंतर नुकत्याच झालेल्या राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत 14.95 टक्के भाडेवाढीला मंजुरी मिळाली. या बैठकीचे अध्यक्षतेखाली परिवहन विभागाच्या अपर मुख्य सचिवांनी एसटीच्या तिकीट दरवाढीला मंजुरी दिली.

या नवीन तिकीट दरवाढीमुळे प्रवाशांना सरासरी 70 ते 80 रुपयांनी जास्त पैसे मोजावे लागतील. उदाहरणार्थ, 100 रुपयांना मिळणारे तिकीट आता 115 रुपयांना उपलब्ध होईल. या भाडेवाढीचा निर्णय एस.टी. महामंडळाने आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी घेतला आहे.सामान्य जनतेला या निर्णयामुळे आर्थिकदृष्ट्या मोठा फटका बसणार आहे, कारण प्रत्येक प्रवासासाठी त्यांना अधिक पैसे खर्च करावे लागतील.यासोबतच, एस.टी. महामंडळाच्या वतीने प्रवाशांना यासाठी अनुकूलतेचे आश्वासन दिलेले नाही

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button