क्राईम

20 हजारांची लाच भोवली : चोरवडमध्ये वीज वितरण कंपनीच्या उपअभियंता एसीबीच्या जाळ्यात

20 हजारांची लाच भोवली : उपअभियंता एसीबीच्या जाळ्यात

जळगाव टाइम्स प्रतिनिधी| भुसावळ (22 जानेवारी 2025): शासकीय विद्युत कामे करणाऱ्या ठेकेदाराचा कामाचा प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर करण्यासाठी तडजोडीअंती 20 हजारांची लाच मागून ती कार्यालयात स्वीकारताना चोरवड वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता प्रशांत प्रभाकर इंगळे (46) याला बुधवारी सायंकाळी जळगाव एसीबीने अटक केल्याने लाचखोरांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

असे आहे लाच प्रकरण

भुसावळातील 49 वर्षीय तक्रारदार हे शासकीय विद्युत ठेकेदार आहेत. त्यांनी एका खाजगी कंपनीचे एनएससी स्किम अंतर्गत नवीन सर्व्हिस कनेक्शनची क्षमतावाढ 100 वॅटहून 200 वॅट करण्याकरीताचा प्रस्ताव आरोपी प्रशांत इंगळे यांच्याकडे दिला होता मात्र हा प्रस्ताव कार्यकारी अभियंता यांना पाठविण्यासाठी प्रलंबित होता. हा प्रस्ताव पाठवण्यासाठी इंगळे यांनी बुधवार, 22 रोजी तक्रारदार यांच्याकडे 25 हजार रुपये लाच मागितल्यानंतर एसीबीकडेतक्रार नोंदवून पडताळणी करण्यात आली. तडजोडीअंती 20 हजार रुपये लाच स्वीकारण्याचे इंगळे यांनी मान्य केले व चोरवड कार्यालयातच त्यांना लाच स्वीकारताच अटक करण्यात आली. भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केला सापळा यशस्वी

पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, नाईक बाळू मराठे, अमोल सुर्यवंशी यांच्यापथकाने हा सापळा यशस्वी केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button