अध्यात्म, संस्कृती आणि सामाजिक ऐक्याचा जागर म्हणजे किर्तन सोहळा – मंत्री गुलाबराव पाटील
अध्यात्म, संस्कृती आणि सामाजिक ऐक्याचा जागर म्हणजे किर्तन सोहळा - मंत्री गुलाबराव पाटील

जळगाव टाइम्स प्रतिनिधी चिंचोली /जळगाव दिनांक 31 जानेवारी – राष्ट्रीय किर्तन सोहळा हा केवळ एक धार्मिक उत्सव नाही, तर तो अध्यात्म, संस्कृती आणि सामाजिक ऐक्याचा जागर आहे. या सोहळ्याच्या माध्यमातून संत विचार आत्मसात करण्याची गरज आहे. मतदारसंघात गावं तिथे भजनी मंडळ साहित्य पुरविले असून विधायक कार्यांना यापुढेही कायम पाठबळ राहणार असल्याचे सांगून विकासासोबत अध्यात्माची जोड असल्यास त्यामुळे समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. राष्ट्रीय कीर्तन महोत्सवातून धार्मिकतेचा जागर होत असून, संत विचारांचा प्रचार आणि संस्कृतीचे जतन करण्यासाठी या माध्यमातून समाजासाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते चिंचोली येथे श्री विठ्ठल मंदिर समितीने आयोजित श्रीराम कथा व राष्ट्रीय कीर्तन महोत्सवाच्या प्रसंगी बोलत होते.
यावेळी कीर्तनकार रामायणकार ह.भ.प. रामराव ढोक महाराज यांनी भाविकांना श्रीराम कथा सांगून अध्यात्म आणि संस्कृतीचे महत्त्व विशद केले. प्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सामूहिक महाआरती करण्यात आली. तसेच ह.भ. प. रामराव ढोक महाराज यांच्या हस्ते मंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला.गाव परिसरातून आलेल्या हजारो भाविकांच्या उपस्थितीत या पवित्र राष्ट्रीय किर्तन सोहळ्याने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला आहे.
यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी श्रीराम कथा व भव्य दिव्य राष्ट्रीय कीर्तन सोहळ्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल श्री. विठ्ठल मंदिर समिती या आयोजकांचे विशेष कौतुक केले.
या प्रसंगी सरपंच किरण घुगे, उपसरपंच सुभाष पवार, विकास सोसायटीचे संजय घुगे, केतन पोळ, अतुल घुगे, विजय लाड, सुनील लाड, शरद घुगे, विलास घुगे, मनोज घुगे व प्रवीण धुमाळ यांच्यासह अनेक मान्यवर व्यक्ती सह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बघा व्हिडिओ